2024 E Book 56 प्रतापगडाची उलटवलेली बाजी

2024 E Book 56 प्रतापगडाची उलटवलेली बाजी
Digital Product

इतिहासाच्या पानांवर बरेच काही लिहीलेले नसते. कारण तसे पुरावे अनुपलब्ध असतात. पण ते समजावून घेणारे डोळे आणि कान असतील तर छोट्या टिंबाना जोडून काही शोधता येईल का असा प्रयत्न करायला काय हरकत आहे?

शिवाजी महाराजांना सुपर मॅन बनवले जाऊ नये. कल्पकता, चातुर्य, साहस, मिळालेल्या नैसर्गिक साधन संपत्तीचा सुयोग्य वापर करणारे, विपरीत परिस्थितीत मानसिक संतुलन ठेवण्याची कला प्राप्त थोर सेनानी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जावे. दरवेळी नव्या युक्त्या वापरून समोरच्या व्यक्तीला, सेनेला नामोहरम करण्याचे कसब त्यांना जागतिक कीर्तीचे महान सेनापती, जनसामान्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण करायला सदैव तत्पर चारित्र्यवान राज्यकर्ता म्हणून प्रतिष्ठा प्राप्त करून देते.

त्यांचे विरोधक अशा सद्गुणांचे नसतील तर काय होते ते आपणास माहित आहे. म्हणून त्यांनी तयार केलेल्या संकल्पना, युद्ध नेतृत्वाची दखल घेतली पाहिजे. पुढच्या काही भागात अफझलखानाच्या मोहिमेच्या संदर्भात असाच एक शोध.


5060